TOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय
विरोधकांनी शिंदे गटाला पुन्हा डिवचले, खोके सरकार, ओके सरकार
![Opponents again divided Shinde group, Khoke government, OK government](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/Virodhak-768x470.png)
नागपूर ः नागपूरमधील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशानाचा आज पहिला दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत सत्ताधाऱ्यांना विशेषत: शिंदे गटातील आमदारांना डिवचण्याचा प्रयत्न केला. तसेच कर्नाटक महाराष्ट्र सीमावादावरून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. पावसाळी अधिवेशनानंतर आता हिवाळी अधिवेशनातही विरोधकांनी 50 खोके एकदम ओके, खोके सरकार, ओके सरकार अशा घोषणाबाजी देत शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यावर बॅनर आणि फलक घेऊन शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. यातून नागपूर हिवाळी अधिवेशनात विरोधक पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक झाले आहेत.
कर्नाटक सरकार हाय, हाय, ईडी सरकार हाय, हाय, अरे खोटरड्या बोम्मईंचा धिक्कार असो, विदर्भावर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, तांदळाला अनुदान मिळाचं पाहिजे, अरे देत कसे नाही घेतल्या शिवाय राहत नाही, अशा घोषणांनी विधिमंडळाचा (Assembly) परिसर दणाणून गेला होता. यावेळी अजित पवार, अंबादास दानवे, धनंजय मुंडे आक्रमकपणे घोषण देत होते. यावेळी जयंत पाटील, आदित्य ठाकरे सुद्धा सामील झाले होते.