पुण्यातील बंदचे लोंढ जर संपूर्ण महाराष्ट्रात पसरत गेल्यास हळूहळू महाराष्ट्रही बंद होईल-संजय राऊत
![If the bandh in Pune spreads to the whole of Maharashtra, Maharashtra will gradually shut down - Sanjay Raut](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/Sanjay-Raut-2.png)
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
पुण्यातील बंदचे लोंढ जर संपूर्ण महाराष्ट्रात पसरत गेले तर, हळुहळु महाराष्ट्रही बंद होईल, असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला. मंगळवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लिहिलेल्या पत्रावर भाष्य केले.
पुण्यातील बंदचे लोंढ जर संपूर्ण महाराष्ट्रात पसरत गेले तर, हळूहळू महाराष्ट्रही बंद होईल, असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला. मंगळवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लिहिलेल्या पत्रावर भाष्य केले. तसेच, पुण्यातील बंदची केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि राज्यपाल यांनी घ्यायला हवी, असे आवाहनही केले.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. राज्यपालांच्या या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राज्यभरात आंदोलन करण्यात आले. अशातच आज पुण्यात राज्यपालांविरोधात बंदची हाक देण्यात आली आहे. त्यानुसार पुण्यातील मार्केटसह सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारींवर टीका केली. “पुण्यात आज बंद आहे. पुणे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असून, शिवाजी महाराजांचे संपूर्ण कार्य हे पुणे आणि रायगडातून पुढे गेलं. जर पुण्यात आज कडकडीत बंद सुरू आहे. या बंदची दखल केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि राज्यपाल यांनी घ्यायला हवी. तुम्ही लिहिलेल्या पत्राचा परिणाम महाराष्ट्रावर झाला नाही हे पुणेकर दाखवून देत आहेत. तसेच, या पुण्यातील बंदचे लोंढ जर संपूर्ण महाराष्ट्रात पसरत गेले तर, हळूहळू महाराष्ट्रही बंद होईल”, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
“येत्या १७ डिसेंबर रोजी जो मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. राज्यातील महाविकास आघाडीचा हा मोर्चा असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणीच हा मोर्चा काढण्यात येणार आहे. सातत्याने आमचे दैवत, शाहु, फुले आणि आंबेडकर यांचा अपमान होत आहे. त्या अपमानाविरोधात हा मोर्चा असणार आहे. त्याचीही दखल केंद्र सरकारने घ्यावी लागले”, असे आवाहनही यावेळी संजय राऊत यांनी केले.
“महाराष्ट्रात जेव्हा गाजलेला पहाटेचा शपथविधी झाला. तेव्हा राज्यपाल आणि गृहमंत्रालयाचा संपर्क जास्त होता. राज्यपालांच्या नियुक्त्यांसंदर्भात गृहमंत्रालय काम करत असते. त्यांचे राजकीय बॉस हे गृहमंत्रीच असतात. त्यामुळे त्यांनी राष्ट्रपतींना म्हणजेच घटनात्मक प्रमुखाला पत्र न लिहिता आपल्या राजकीय बॉसला पत्र लिहिल्याचे दिसते”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी राज्यपालांच्या पत्रावर टीका केली.