ग्रीन टी पिताय ? सावधान !ग्रीन टी
![Drinking green tea? Beware of green tea](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/543570-green-tea-780x470.webp)
पण या दाव्यांना कोणताही ठोस वैज्ञानिक आधार नाही. या जाहिरातबाजीला बळी पडून तुम्ही ग्रीन टी सेवन करत असाल तर आताच सावध व्हा… फिट आणि फाईन राहायचं असेल तर ग्रीन टी प्या, अशा जाहिराती तुम्ही पाहिल्या असतील. ग्रीन टी प्यायल्यानं तुम्ही स्लीम व्हाल, तुमची इम्युनिटीवाढेल, असे दावेही केले जातात.
जीवघेणी ग्रीन टी
डायबिटीस , स्थूलपणा आणि हृदय रोगाच्या रुग्णांना ग्रीन टी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण ग्रीन टीच्या जादा सेवनामुळं तुमच्या यकृताला धोका निर्माण होऊ शकतो. द जर्नल ऑफ डायटरी सप्लिमेंटच्या ताज्या अभ्यासात ही धक्कादायक बाब उघड झालीय. ग्रीन टीमध्ये कॅटेचिन नावाचं अँटी ऑक्सीडंट असतं, त्यामुळं यकृताला सूज येऊ शकते
गेल्या वर्षभरापासून संशोधक ग्रीन टी सेवन करणाऱ्यांचा अभ्यास करत होते. यामध्ये पाळी गेलेल्या महिलांचाही समावेश करण्यात आला होता. यात एक हजार महिलांचा समावेश करण्यात आला होता. 3, 6, 9 आणि 12 महीन्यांचा डेटा यात गोळा करण्यात आला. यात धक्कादायक माहिती समोर आली.