काँग्रेसची धुरा सुरक्षित ‘हातात’ जायला हवी
![The axis of Congress should go into safe 'hands'](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/WhatsApp-Image-2022-10-14-at-3.18.46-PM-768x470.jpeg)
मनीष तिवारींकडून खर्गेंचे कौतुक
नवी दिल्ली ।
मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाच्या सर्वात खालच्या पदापासून काम केले आहे त्यामुळे त्यांचा अनुभवसुद्धा दांडगा आहे. अशा भावना मनीष तिवारी यांनी व्यक्त केल्या.
काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक होत आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये अनेक जणांची नावं आहेत अशातच काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी आता जी – 23 परिषदेचे सहकारी असलेले शशी थरूर यांना बेदखल करत मल्लिकार्जुन खर्गे यांचं कौतुक होत आहे. खर्गे यांनी प्रस्तावात सादर केलेल्या नावांपैकी मनीष तिवारी हे एक आहेत.
काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. या अध्यक्षपदासाठी अनेक जण शर्यतीत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे आणि शशी थरुर हे दोन उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. दरम्यान काँग्रेसचे नेते मनीष तिवारी हे मल्लिकार्जुन खर्गे यांचे कौतुक करताना म्हणाले, काँग्रेस पक्षाची घडी सावरण्यासाठी अशाच सक्षम हातांची गरज आहे. मनीष तिवारी यांनी खर्गे यांचे तोंडभरून कौतुक सुद्धा केले.
दरम्यान मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्या आयुष्यातील 50 वर्षांपेक्षा अधिक काळ काँग्रेसच्या सेवेसाठी घालवला आहे. त्यामुळेच सुरक्षित हातांमध्ये काँग्रेस पक्षाची धुरा असायला हवी. मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाच्या सर्वात खालच्या पदापासून काम केले आहे त्यामुळे त्यांचा अनुभवसुद्धा दांडगा आहे.’ अशा भावना मनीष तिवारी यांनी व्यक्त केल्या.
दरम्यान, येत्या 17 ऑक्टोबर रोजी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. तर 19 ऑक्टोबरला या निवडणुकीच्या निकालाची घोषणा करण्यात येईल. तब्बल 22 वर्षांनंतर देशातील सर्वात जुन्या पक्षासाठी निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीच्या रिंगणात मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरुर हे दोन उमेदवार आहेत. दरम्यान राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय यांनीही मल्लिकार्जुन खर्गे यांना समर्थन दर्शविताना आपलं नाव मागे घेतलं होतं.