जात प्रमाणपत्राच्या मुद्दय़ावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरुद्ध मुंबईतील महानगरदंडाधिकारी न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट
![Mumbai Metropolitan Magistrate Court issues non-bailable arrest warrant against Amravati MP Navneet Rana and his father over caste certificate issue](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/navneet-rana-780x461.jpg)
मुंबई : जात प्रमाणपत्राच्या मुद्दय़ावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरुद्ध मुंबईतील महानगरदंडाधिकारी न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे. गेल्या महिनाभरात या दोघांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आल्याची ही दुसरी वेळ आहे.
राणा या ज्या जागेवरून निवडून आल्या ती जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित होती. परंतु राणा यांनी त्या अनुसूचित जातीतील असल्याचा दावा केला होता आणि निवडणूक लढवली होती. मात्र शाळा सोडल्याच्या खोटय़ा दाखल्याच्या आधारे त्यांनी जात प्रमाणपत्र मिळवून फसवणूक केल्याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, राणा आणि त्यांच्या वडिलांवर आरोप निश्चित करण्याच्या प्रक्रियेला स्थगिती मिळावी यासाठी राणा यांच्या वकिलांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.