शिक्षणामुळेच आयुष्याला कलाटणी मिळते: अनुराधा ओक
![Education transforms life: Anuradha Oak](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/WhatsApp-Image-2022-09-10-at-4.34.27-PM.jpeg)
पिंपरी: चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयाच्या इयत्ता 11 वी. च्या नवोदित विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसमवेत स्वागत समारंभ पार पडला. यावेळी सचिव अनुराधा ओक व उद्योन्मुख मराठी चित्रपट अभिनेत्री श्रेया पासलकर यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून या सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा यांच्याहस्ते दोघांना स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, डॉ. पोर्णिमा कदम, मुख्य प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. वनिता कुर्हाडे आदी उपस्थित होते. स्वागत समारंभाच्या निमित्ताने कला, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी झालेल्या आणि पुरुषोत्तम व रत्नाकर करंडक स्पर्धेत पारितोषिक मिळविलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थी तसेच, शिक्षण व क्रीडा क्षेत्रात उत्त्कृष्ठ काम करणार्या डॉ. सुनिता पटनाईक, प्रा. जस्मीन फरास, प्रा. वैशाली देशपांडे, प्रा. शबाना शेख, प्रा. अर्चना गांगड यांचा सत्कार सचिव अनुराधा ओक, सिनेअभिनेत्री श्रेया पासलकर, सविच डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे आदींच्या हस्ते सन्मानपूर्वक स्मृतीचिन्ह, मेडल प्रदान करून करण्यात आले. यावेळी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेच्या आधारावर विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.
विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक पुढे म्हणाल्या, “कमला शिक्षण संकुलातील विविध शाखेत शिकणार्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच त्याच्या अंगीभूत असलेल्या कलागुणांचा विकास करण्याचा ध्यास अंगीकारून संस्था कार्यरत आहे ही, कौतुकास्पद बाब आहे.”
विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याचा 11 वी. 12 वी. हा पाया महत्वाचा आहे. प्रत्येक पालकांना आपल्या पाल्याविषयी काळजी वाटते, पुढे काय करायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. परंतु, त्यांच्या पालकांनी स्वतःचे आपले विचार विद्यार्थ्यांवर लादू नये. आपल्या पाल्यांची क्षमता, त्यांची आवड, त्याला काय व्हायचयं हे महत्वाचे असते. मुलांच्या आनंदात पालकांनी आनंद व समाधान मानले पाहिजे. त्यांच्याबरोबर एका मित्रासारखे राहीले. तर, मुले भविष्यात भरकटणार याची खात्री पालकांनी बाळगावी. इ.10 वी. पर्यंत मुले आई-वडीलांचे ऐकतात. इ.11 वी. नंतर त्यांची भूमिका समजून घ्यावी. कारण मुले संवेदनशील असतात. त्यांचे मित्र, संगत याकडेही पालकांनी विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
सिनेअभिनेत्री श्रेया पासलकर म्हणाल्या, “विद्यार्थ्यांनी कला, नाट्य क्षेत्रात अभिरूची असल्यास प्रयत्न जरूर करा, परंतु आपल्या आई-वडीलांचे स्वप्न व शिक्षणापासून दूर जावू नका, असे आवाहन केले.”
प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे म्हणाले, कमला शिक्षण संकुल संचलित महाविद्यालयाचा आलेख दरवर्षी वाढत आहे. त्यांचे प्रमुख कारण म्हणजे संस्था संस्थापक डॉ. दीपक शहा यांना मालक व नोकर ही संकल्पनाच मान्य नसून एक कुटूंब प्रमुखाची आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढत राहील, कला, क्रीडा, साहित्य आदी क्षेत्राची विशेष आवड असणार्यांना अधिकाधिक संधी कशी उपलब्ध करून देता येईल. यासाठी सतत जागरूकपणे सूचना करतात. विद्यार्थी घडला पाहिजे, त्यांच्या अंगीभूत कला गुणांचा विकास होऊन आदर्श नागरीक बनला पाहिजे. अशीच शिकवण डॉ. दीपक शहांची सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांना सातत्याने असते.
समारंभाचे अध्यक्ष व संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा म्हणाले, पालकांनी प्रतिभा महाविद्यालयाची मुलांना प्रवेशासाठी निवड केली. ही संस्थेच्या दृष्टीने आनंदाची बाब असली तरी, स्पर्धेचे युग असले तरी गतवर्षी यासंस्थेतील इ.12 वीत 720 विद्यार्थ्यांचा बोर्डात 100 टक्के निकाल लागला. त्यासाठी प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ. वनिता कुर्हाडे यांनी मेहनत घेत ही किमया साध्य केली आहे. शैक्षणिक गुणवत्तेसाठी विद्यार्थ्यांना उद्देशून डॉ. शहा पुढे म्हणाले, आपल्या घरची परिस्थिती कसलीही असो, तुम्ही फक्त ध्येयाकडे लक्ष केंद्रीत करा. तुम्ही कोण आहात हे महत्वाचे नसून मनातील इच्छा-शक्ती महत्वाची आहे. आपल्या मनातील नकारात्मकता काढा. आई, वडील त्यागातून तुम्हाला शिकवितात मी हे करू शकतो हा ध्यास अंगिकारत उज्वल भविष्याचा मार्ग निवडावा असे आवाहन केले.
यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. वनिता कुर्हाडे यांनी यावेळी महाविद्यालयात विद्यार्थीभिमुख जे उपक्रम राबविली जातात, त्याबाबतची सविस्तर माहिती विशद केली.
यावेळी डॉ. रविंद्र निरगुडे, डॉ. सुनिता पटनाईक यांनी उपस्थितांचे स्वागत वाचन केले. सूत्रसंचालन प्रा. सुकन्या बॅनर्जी व प्रा. स्नेहल साळवी यांनी केले. आभार उपप्राचार्या डॉ. वनिता कुर्हाडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. चिन्मय जैन, प्रा. स्नेहा भाटीया, प्रा. तृप्ती बजाज इतर प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले.