बिनबोभाट खरेदी : प्रशासकीय राजवटीत मनमानी?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/Open-Jim.jpg)
ओपन जीमच्या साहित्यासाठी निविदा नाही
पिंपरी-चिंचवड । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील उद्याने, मैदान, पदपथ अशा ३४ ठिकाणी ओपन जीम ही संकल्पना राबवली आहे. त्यापैकी आठ ठिकाणी निविदा प्रसिद्ध न करता जीमसाठी साहित्य बसवून देण्यात येणार आहे. त्यासाठी ६६ लाख रूपये खर्च होणार आहे.प्रशासकीय राजवटीत हा बिनबोभाट निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेच्या शहरात ८६ व्यायाम शाळा आहेत. अ, ब आणि क या वर्गानुसार व्यायाम शाळांचे धोरण तयार करण्यात आले आहे. याशिवाय महापालिकेने शहरात ठिकठिकाणी उद्याने, मैदान, पदपथ अशा ठिकाणीही ओपन जीम ही संकल्पना राबवली आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणारे नागरिक मोठ्या प्रमाणात या ओपन जीमचा लाभ घेतात. महापालिकेच्या क्रीडा विभागामार्फत आवश्यकतेनुसार विविध ओपन जीमसाठी साहित्य पुरवठा करून बसवून देण्यात येणार आहे. शहरात एकूण ३४ ठिकाणी या ओपन जीम उभारण्यात आल्या आहेत. या जीमसाठी साहित्य आवश्यक आहे.
एका सेटसाठी साडे आठ लाखांचा खर्च…
क्रीडा विभागाच्या मागणीनुसार ७० लाख तरतुदीच्या मर्यादेत १३ प्रकारचे विविध ओपन जिम साहित्य प्रत्येकी ३४ नग ३४ ठिकाणी पुरवठा करून बसवून देण्यात येणार आहे. सध्या आठ ठिकाणांसाठी या साहित्याचा पुरवठा करण्याकरिता चार पुरवठादारांनी लघुत्तम दर सादर केले. त्यामध्ये पुण्यातील एड्यनिडस यांनी तीन बाबींसाठी प्रति नग एवूâण २ लाख ३७ हजार रूपये दर सादर केला. ठाणे येथील बाबा प्ले वल्र्ड यांनी तीन बाबींसाठी प्रति नग १ लाख ५८ हजार रूपये दर सादर केला. ठाणे येथील हनी फन एन थ्रील कंपनीने तीन बाबींसाठी १ लाख ७६ हजार रूपये आणि पुण्यातील त्रिमुर्ती इंजिनिअरींग यांनी चार बाबींसाठी प्रति नग एकूण २ लाख ५५ हजार रूपये असा दर सादर केला. त्यानुसार, एका सेटसाठी ८ लाख २७ हजार रूपये खर्च होणार असून आठ ठिकाणी हे ओपन जिम साहित्य बसविण्यासाठी एवूâण ६६ लाख २१ हजार रूपये खर्च होणार आहे.