चिंचवडमध्ये तडीपार आरोपी हत्यारासह गजाआड
![5 terrorists arrested by Delhi Special Cell](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/arrest-new11_2017084089.jpg)
चिंचवड – बिजलीनगर येथे गुरुवारी रात्री गुरूद्वाराकडे जाणा-या रस्त्यावर चिंचवड पोलीस ठाण्याने तडीपार केलेला एकाला हत्यारासह अटक करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला ताब्यात घेण्यात आले. उचप्पा लिंगाप्पा मंगळूर (वय २५ रा. बिजलीनगर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने त्याची १४ दिवस येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील , सहा पोलीस आयुक्त,पिंपरी विभाग सतिश पाटील ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे पोलीस निरीक्षक(गुन्हे) विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासपथकाचे सहा पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव,पोलीस हवलदार,जगताप,स्वप्निल शेलार,अमोल माने, गोविंद डोके, पंकज भदाने, वंदना गायकवाड यांनी केली.