breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
रहाटणीत राज ठाकरे आले अनं जीमचे उद्घाटन करुन निघून गेले
पिंपरी – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे हस्ते रहाटणीतील काेकणे चाैकात एका खासगी जिमच्या उद्घाटन आज (शुक्रवारी) करण्यात आले. त्यांनी जिमचे उद्घाटन करुन ते निघून गेले. त्यामुळे उपस्थितांचा चांगलाच हिरमोड झाला. यावेळी पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर व पूर्वाश्रमीचे मनसैनिक राहुल जाधव यांनी राज ठाकरे यांचे स्वागत केले.
यावेळी शहराचे महापौर राहुल जाधव, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे, राजू सावळे उपस्थित होते. याशिवाय मनसेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.