Uncategorizedताज्या घडामोडीमराठवाडा
अहमद नगरच्या विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये ब्रेनडेड झालेल्या युवकाची अवयव दान , ४ जणांना जीवदान
![Organ donation of branded youth at Vikhe Patil Memorial Hospital, Ahmednagar, 4 lives saved](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Organ-donation-of-branded-youth-at-Vikhe-Patil-Memorial-Hospital-Ahmednagar-4-lives-saved.jpg)
- अहमदनगरमधील पहिली घटना
- पुणे, नाशिकला अवयव पाठवले
- चार रुग्णांना जीवदान मिळणार
अहमदनगर ते पुणे नगर ते नाशिक केला ग्रीन कॉरिडॉर
राहुरी तालुक्यातील एका २५ वर्षीय मुलाचा अपघात झाला होता. ब्रेन डेड झाल्याने त्याच्या नातेवाईकांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नगरच्या डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. पुणे व नाशिक येथील पथके अहमदनगरमध्ये दाखल झाली होती. त्या युवकाचे चार अवयव काढून चार वेगळ्या रुग्णांना देण्यात आले आहेत. मृत तरूणांचे ह्रदय सुद्धा उपलब्ध होते, मात्र महाराष्ट्रामध्ये त्याची गरज असल्याचा रुग्ण नाही. पावसाळी हवामानामुळे हेलिकॉप्टरने बाहेर पाठविता येत नसल्याचे विखे पाटील यांनी सांगितले