पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळाची १८ वी बैठक संपन्न
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/mahapalika-1.jpg)
पिंपरी : पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळाची १८ वी बैठक अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, दि. २० जून २०२२ रोजी स्मार्ट सिटी कार्यालय, ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे पार पडली. या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. यावेळी, महापालिका आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील, नामनिर्देशक संचालक (GOI) ममता बत्रा, स्वतंत्र संचालक यशवंत भावे, प्रदीपकुमार भार्गव, सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य वित्तीय अधिकारी सुनिल भोसले, कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार, महाव्यवस्थापक अशोक भालकर, कार्यकारी अभियंता मनोज सेठीया, सहा.मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीकांत कोल्हे यांच्यासह अधिकारी तसेच सल्लागार प्रतिनिधी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची संचालक तर किरणराज यादव यांची सह मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी निवडीच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेल्या स्मार्ट सारथी ऍप व सिटी इंगेजमेंट हा प्रकल्प पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु करण्याच्या प्रस्तावास बैठकीत मान्यता देण्यात आली.
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या ओएफसी प्रकल्पासाठी मे. क्रिएशन्स इंजिनीअर्स प्रायव्हेट लिमिटेड यांची डक्ट पुरविणे आणि टाकणेकामी प्रकल्प सल्लागार म्हणून नेमणूक करण्यास मान्यता देण्यात आली. पिंपरी चिंचवड महापालिका हददीतील राजीव गांधी पुल ते काळेवाडी फाटा पर्यंतचे फुटपाथ च्या कामकाजासाठी मे. निखील कन्स्ट्रक्शन ग्रूप प्रा.लि. यांच्या नेमणुकीच्या विषयास मान्यता देण्यात आली. तसेच, सदरील प्रकल्पासाठी मे. इन्व्हीरोसेफ कन्स्लटंट यांची प्रकल्प सल्लागार म्हणून निवडीबाबतच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान, प्रकल्प सल्लागार यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेल्या विकास प्रकल्पांचे सादरीकरण केले. त्यावर संचालक मंडळाद्वारे चर्चा होवून पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेण्यात आले. कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले.