Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
एमपीएससी परीक्षेत यश प्राप्त केलेल्या थेरगावची कन्या तमन्ना शेख हिचा सन्मान
![एमपीएससी परीक्षेत यश प्राप्त केलेल्या थेरगावची कन्या तमन्ना शेख हिचा सन्मान](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/महाराष्ट्र-लोकसेवा-आयोग-परीक्षेत-यश-प्राप्त-केलेल्या-थेरगावची-कन्या-तमन्ना.jpg)
पिंपरी : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एजुकेशन फाउंडेशनच्या वतीने थेरगावच्या तमन्ना शेख हिची नायब तहसीलदार पदी निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. २०२१-२२ मध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये तमन्ना शेख हिने उत्कृष्ठ असे यश मिळवले. त्यानंतर तिची नायब तहसीलदार पदी निवड झाली. त्यामुळे संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख, इकबाल शेख यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
तमन्ना शेख हिच्या घरची परिस्थिती बिकट आहे. आई शिवणकाम करून कुटुंबाला हातभार लावते. वडील फोर्स मोटर्स कंपनीत कामाला आहेत. थेरगाव येथील आनंदवन सोसायटीत राहावयास असलेल्या शेख कुटुंबातील तमन्ना हिने कुठलाही क्लास न लावता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. तिसऱ्या प्रयत्नामध्ये मुलींमध्ये राज्यात ८ वी, सर्वसाधारण गटात १०६ वी येऊन तिची नायब तहसीलदार पदी निवड झाली आहे.
”मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाबद्दल जागरूकता कमी आहे. मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवतात. त्यामुळे मुस्लिम महिला संवेदनशील असतात. ह्या जातीच्या बुरख्यातून बाहेर पडून पुढील पिढीला शिक्षणासाठी प्रोत्साहित करावे व नवीन पिढीला आगळा वेगळा आदर्श निर्माण करावा.” असे उद्गार संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांनी काढले.