breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारण
श्रीक्षेत्र देहूत सोमवारी होणार वारकरी कीर्तनकार परिषद
- खासदार शरद पवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
देहू । प्रतिनिधी
देहूत सोमवारी (दि. 6) रोजी वारकरी कीर्तनकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. संतकृपा लॉन येथे दुपारी 3 वाजता होणाऱ्या या परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. विठोबा रखुमाई मुक्ती आंदोलनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी डॉ. भारत पाटणकर, कॉ. धनाजी गुरव, हभप डॉ. सुहास फडतरे महाराज, हभप ज्ञानेश्वर बंडगर महाराज, सचिन परब, हभप ताई महाराज आदी प्रमुख वक्ते असणार आहेत. तर संपत देसाई, मोहन अनपट, विजय मांडके, अंकुश शेडगे हे निमंत्रक असणार आहेत.