Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

अपघाताग्रस्त गाडीत सापडले चार लाख; दोन पोलिसांनी केलं असं काही की तुम्हीही कराल कौतुक!

नवी मुंबईः पोलिसांमधील माणूसकीचे व प्रामाणिकपणाचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे. मनोहर पाटील आणि किशोर कार्डिले या दोन कॉन्स्टेबलच्या प्रमाणिकपणाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. त्याला कारणही तसंच आहे. रस्ते अपघातात एका जोडप्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर घटनास्थळी या दोन पोलिसांना चार लाख रुपयांची रोकड सापडली. ही रोकड या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलिस ठाण्यात सुपूर्द केली आहे.

हज यात्रेला जाण्यासाठी या जोडप्याने बँकेतून रोकड काढली. मात्र, घरी परतत असताना मुंब्रा-पनवेल मार्गावर त्यांचा अपघात झाला. त्यावेळी पाटील व कार्डिले यांची तिथेच ड्युटी होती. त्यांना या अपघाताची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांनाही त्यांनी तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. ड्युटीवर असलेल्या पाटील आणि कार्डिले यांनी त्यांची ओळख पटवण्यासाठी काही कागदपत्रे सापडताहेत का या हेतूने त्यांच्या दुचाकीची तपासणी केली. त्यावेळेस स्कुटरच्या सीटखाली त्यांना रोकड सापडली.

तळोजा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या मनोहर पाटील आणि किशोर कार्डिले यांनी दुचाकीत सापडलेली ४ लाखांची रोकड ताब्यात घेतली व पोलिस ठाण्यात जमा केली. त्यानंतर अपघातात मृत्यू झालेल्या दाम्पत्याच्या मुलाला पोलिस ठाण्यात बोलवून ही रोकड त्यांच्याकडे सुपूर्द केली. मयत दाम्पत्य बँकेतून परत येत असताना स्पीडब्रेकरवर स्कुटर आदळली. त्यातच मागून येणाऱ्या भरधाव ट्रेलरने त्यांच्या दुचाकीला धडक दिले. या अपघातात ते दोघंही गंभीर जखमी झाले होते. त्या ट्रेलरच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिस निरीक्षकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर आम्ही त्या दाम्पत्याच्या मुलाचा शोध घेतला. व त्याच्याकडे ही रोकड जमा केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button