Breaking-newsमहाराष्ट्र
सरकारशी चर्चा नाही: मराठा समाज आंदोलकांचा निर्णय
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/04/maratha.jpg)
लातुर: आमच्या मागण्यांच्या संबंधात या आधी आम्ही सरकारला निवेदन दिले आहे. आता पुन्हा या विषयी सरकारशी चर्चा करण्याची गरज आम्हाला वाटत नाही. आमच्या मागण्यांच्या संबंधात सरकारशी जे समन्वयक चर्चा करीत आहेत त्यांचा समाजाशी संबंध नाही अशी भूमिका आज येथे झालेल्या मराठा समाज मेळाव्यात मांडण्यात आली.
लातुरच्या राहीचंद्र मंगल कार्यालयात आज मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत ही भूमिका मांडण्यात आली. लातुर जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. आम्हाला आता सरकारशी चर्चा करण्यात स्वारस्य नाही. आम्हाला आता निर्णय हवा आहे असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. यावेळी पुढील आंदोलनाची दिशाही ठरवण्यात आली.
त्यानुसार 1 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट या अवधीत राज्यव्यापी आंदोलन केले जाणार आहे. हे आंदोलन सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत असेल. या अवधीत प्रत्येक गावातील वेशीवर समाज बांधव गुराढोरांसह ठिय्या देणार आहेत. सर्व मराठा आमदार आणि खासदारांच्या घरासमोरही ठिय्या आंदोलन या काळात करण्यात येणार आहे. मराठा समाज आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे सर्वसकट मागे घेतले जावेत अशी मागणीही यावेळी करण्यात आली.