एमबी कॅम्प येथे भर दिवसा तरुणावर कोयत्याने वार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/crime-pcmc-1.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
रागाने बघितल्याचा समज झाल्याने एकाने तरुणावर कोयत्याने वार केले. यात तरुण जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. 11) दुपारी साडेपाच वाजता एमबी कॅम्प, देहूरोड येथे घडली.
कन्हैया संपत कन्नप्पा (वय 22, रा. एमबी कॅम्प, देहूरोड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहित टेका उर्फ राजा स्वामी (रा. एमबी कॅम्प, देहूरोड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमबी कॅम्प येथील सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या बाहेर फिर्यादी थांबले होते. त्यावेळी ‘माझ्याकडे घुरून का पाहतो’ असे म्हणत आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण केली. ‘मी तुझ्याकडे पाहिले नाही’ असे फिर्यादी सांगत असताना आरोपीने फिर्यादी यांच्यावर कोयत्याने वार केले. यात फिर्यादी जखमी झाले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.