शिवसेनेची भूमिका दुटप्पी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/shivsena-paksh-1-2.jpg)
मुंबई – मराठा आंदोलनाबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी असल्याचा ठपका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ठेवला. एकिकडे मराठा आरक्षण देण्यात सरकारने हलगर्जी केल्याचा आरोप करून लोकसभेतून सभात्याग केला जातो, तर दुसरीकडे राज्यात शिवसेनेचे मंत्री अजूनही सरकारमधील खुर्च्या उबवताना दिसतात.
शिवसेनेचे नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मराठा आरक्षणाच्या विलंबासाठी मुख्यमंत्री कारणीभूत असल्याची टीकाही केली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत शिवसेनेची भूमिका प्रामाणिक असेल तर “बोलाचाच भात, बोलाचीच कढी’ पुरे करून त्यांनी आजच्या आज सरकारबाहेर पडण्याची घोषणा करावी, असे आव्हान राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले आहे.
शिवसेना यापुढेही सत्तेत कायम राहिली तर शेतकऱ्यांप्रमाणेच मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतही शिवसेनेचा कळवळा बेगडी असल्याचे स्पष्ट होईल, अशी टीकाही विखे-पाटील यांनी केली.