पिंपरी / चिंचवड
गुटखा विक्री प्रकरणी तरुणाला अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/IMG-20211205-WA0015.jpg)
पिंपरी | प्रतिनिधी
शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्री प्रकरणी दरोडा विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 30) दुपारी सव्वाचार वाजता मोईगाव येथे करण्यात आली.
स्वप्नील बाबासाहेब कातोरे (वय 27, रा. कडवस्ती, ता. खेड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई अमर कदम यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोई गावात येलवंडे वस्तीकडे जाणा-या रस्त्यावर आरोपी मोकळ्या जागेत शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विकत होता. याबाबत दरोडा विरोधी पथकाला माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाई करून स्वप्नील याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 77 हजार रुपये किमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.