Breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

राज ठाकरेंच्या सभेवर अजित पवारांचे मोठे वक्तव्य, पाहा काय म्हणाले…

पुणे |

आज औरंगाबाद येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जंगी सभा होणार आहे. तर मुंबईत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची ‘बुस्टर डोस’ सभा होणार आहे. महाराष्ट्र दिनी होणाऱ्या या दोन मोठ्या सभांवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. आज महाराष्ट्र दिन आहे. यशवंतराव चव्हाणांचा हा महाराष्ट्र आहे. आपण सुसंस्कृत आहोत. प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. आजच्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने काहींनी सभा आयोजित केल्या असतील, असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे. तर, कोणतीही सभा घेताना पोलीस आयुक्तांची परवानगी आवश्यक असते. औरंगाबादेतल्या सभेला पोलिसांनी काही अटी घातल्या आहेत. त्याचे पालन संबंधितांनी करावे. म्हणजे वातावरण चांगले राहील, असं देखील अजित पवार म्हणाले आहेत.

शिवाजीनगरच्या पोलीस संचलन मैदानात उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त ध्वजवंदन आणि संचलन समारंभ पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, जातीय, धार्मिक सलोखा आपल्याला कायम ठेवायचा आहे. आपल्या वक्तव्यातून तेढ निर्माण होईल, वाद निर्माण होईल, अशी वक्तव्ये टाळावी, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. तर, दुसरीकडे तलवारींचा साठा सापडला आहे. त्याची माहिती पोलीस खाते घेत आहे. विद्ध्वंस घडवण्याचा काहींचा प्रयत्न असावा. त्या आत्ताच का सापडत आहेत, त्याचा मास्टरमाइंड कोण, याचा शोध सुरू आहे, असेही ते म्हणाले. पोलीस दल सगळीकडे चोख बंदोबस्त ठेवून आहे. तलवारीचा साठा सापडला त्यावर पोलीस जप्तीची कारवाई करत आहेत, असेही पवार म्हणालेत.

  • ‘आमची गाडी किती पळावी हे पायलटवर अवलंबून असतं’

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केलं असून वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी अजित पवार यांनी 27 हजारांचा दंड भरला आहे. यावर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे. “आमची गाडी किती पळावी हे पायलटवर अवलंबून असतं. मी नियम मोडू नका असं सांगत असतो. तुम्ही उलट आमचं कौतुक केलं पाहिजे २४-२५ हजार मी ताबडतोब भरले”, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button