ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

खासदार बारणे यांच्याहस्ते संभाजी भेगडे यांचा सत्कार!

राजकीय: शिवसेना उद्योग सहकारी सेनेच्या शहर प्रमुखपदाची जबाबदारी

पिंपरी-चिंचवड | शिवसेना उद्योग सहकारी सेनेच्या पिंपरी-चिंचवड शहर प्रमुखपदी संभाजी भेगडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्कार सोहळ्यात खासदार बारणे यांनी संभाजी भेगडे यांना पुढील संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा देत उद्योग क्षेत्रातील कार्यकर्ते आणि उद्योजकांना एकत्रित करून संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले.

यावेळी संभाजी भेगडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “खासदार श्रीरंग बारणे यांचे मार्गदर्शन नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडणार असून, पिंपरी-चिंचवडमधील उद्योजक, व्यावसायिक आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटनेच्या बळकटीसाठी काम करणार आहे.”

हेही वाचा

‘नीट’ फेरपरीक्षा पारंपरिक पद्धतीनेच; संगणक आधारित चाचणीची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भेगडे, पुणे शहराध्यक्षा सदानंद कडलक, राज्य समन्वयक विपुल चेपट, विष्णू पाटील, शुभम लोखंडे, ॲड. प्रवीण गायकवाड, सुदर्शन देसले, हरिनारायण डोबाळे, उद्योजक हेमंत नागपुरे, सौ. आरती भेगडे, दत्ताभाऊ कुचेकर, आशिष चव्हाण, धर्मेंद्र जयदे, चैतन्य होळकर, राहुल अडगळे, अश्विन खुडे, प्रताप देवडकर, महेश नेरे, तन्मय जाधव, सिद्धांत पाटील, साई पवार, संकेत शिंदे, सुदर्शन चिकणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

संभाजी भेगडे यांच्या नियुक्तीमुळे पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रात शिवसेना उद्योग सहकारी सेनेच्या संघटनात्मक विस्ताराला नवी चालना मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. उद्योग, सहकार आणि सामाजिक क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी भेगडे यांच्या नेतृत्वाखाली संघटना अधिक प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

शिवसेना उद्योग सहकारी सेनेच्या पिंपरी-चिंचवड शहर प्रमुखपदाची जबाबदारी ही माझ्यासाठी सन्मानासोबतच मोठी जबाबदारी आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. पिंपरी-चिंचवडमधील उद्योजक, व्यावसायिक आणि कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन उद्योग क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी तसेच संघटना तळागाळापर्यंत मजबूत करण्यासाठी मी कटिबद्धपणे काम करणार आहे.

– संभाजी भेगडे, शहर प्रमुख, सहकारी सेना, शिवसेना.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button