धक्कादायक! शिलनाथ यात्रेत ५० भाविकांवर मधमाश्यांचा हल्ला, धावपळीत एकाचा दरीत कोसळून मृत्यू
![Shocking! Bee attack on 50 devotees during Shilnath Yatra](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/Shocking.jpg)
सातारा | सातारा तालुक्यातील शिवाजीनगर येथे डोंगरावर शिलनाथाची यात्रा आजपासून सुरु झाली आहे. या देवाच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केला. यामध्ये सुमारे ५० भाविकांना चावा घेतल्याची प्राथमीक माहिती आहे. यावेळी गडावर शेकडो भाविक उपस्थित होते.
मधमाशांनी केलेल्या या हल्ल्यात सोमेश्वर विलास कदम या तारळे येथील १३ वर्षाचा मुलाचा डोंगराच्या कड्यावरून खाली कोसळून जागीच मृत्यू झाला आहे. ग्रामस्थ आणि आ.शिवेंद्रराजे भोसले ट्रेकर्सचे कार्यकर्त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन दरीत पडलेल्या मुलाला बाहेर काढलं. मात्र, त्याचा जागेवरच मृत्यु झाल्याची प्रथमिक माहिती ग्रामस्थांनी दिली.
मृत्यु पावलेल्या १३ वर्षांचा सोमेश्वर त्याच्या मामाच्या शेरेवाडी या गावाला सुट्टीसाठी आला होता. सकाळच्या सुमारास डोंगरावर फिरण्यासाठी गेल्याच्या नंतर डोंगराच्या कपारीत बसलेल्या मधमाशांनी अचानक हल्ला केला. यावेळी धावपळीत सोमेश्वर याचा पाय घसरला आणि तो थेट दरीत पडल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात त्याचा मृत्यु झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र, अनेक लोकांना मधमाशांनी चावा घेल्यामुळे यात सुमारे ५० लोकं जखमी झाले आहेत. गेल्या चार वर्षांपुर्वी यात्रे दरम्यानच मधमाशांनी चावा घेण्याची घटना घडली होती. मात्र यात कोणाचही मृत्यु झाला नव्हता.