ताज्या घडामोडीपुणे

#RaghunathKuchik : रघुनाथ कुचिक यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेणार, पीडित तरुणीचा मोठा निर्णय

पुणे |  शिवसेना नेते रघुनाथ कुचिक लैंगिक अत्याचार प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. कारण, पीडित तरुणीने चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले असून आता पीडिता रघुनाथ कुचिक यांच्याविरोधातील तक्रार मागे घेणार असल्याची माहिती आहे. माध्यमांशी बोलताना तरुणीने हा मोठा खुलासा केला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तक्रार मागे घेण्यासाठी कुठलाही दबाव नसल्याचंही पीडितेने सांगितलं आहे.

या सगळ्या प्रकरणाचा राजकीय फायदा घेतला गेला असून चित्रा वाघ यांनी सुसाईड नोट लिहावी असा गंभीर आरोप पीडितेकडून करण्यात आला आहे. मला सुरुवातीपासून तक्रार दाखल करायची नव्हती पण चित्रा वाघ, मोहम्मद अहमद यांच्या जबरदस्तीमुळे मी तक्रार दाखल केली, असंही पीडित तरुणीने म्हटलं आहे.

दरम्यान, पीडिते काल आणि आजही माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली असून यावेळी त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. चित्रा वाघ (Chitra Wagh) याच मला पोलिसांना काय जबाब द्यायचा, हे सांगायच्या. त्यांच्या माणसांकडून माझ्यावर सतत पाळत ठेवली जात होती. एवढेच नव्हे तर रघुनाथ कुचिक यांच्याविरुद्ध तू बोलली नाहीत तर आई-वडिलांसह तुला मारून टाकू, अशी धमकीही चित्रा वाघ यांनी मला दिल्याचा आरोप पीडीतेने याआधीही केला होता.

पीडितेच्या या गौप्यस्फोटामुळे एकच खळबळ उडाली आहे. तिने चित्रा वाघ आणि रघुनाथ कुचिक यांचा पीए रोहित भिसे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रोहित भिसे हाच रघुनाथ कुचिक यांची सर्व माहिती चित्रा वाघ यांना पुरवत होता. मी रघुनाथ कुचिक यांच्याकडे होते तोपर्यंत सर्वकाही नीट होते. मात्र, मी घरी परतल्यानंतर चित्रा वाघ यांच्यासह सर्वांनी माझ्यावर दबाव आणून मला रघुनाथ कुचिक यांच्याविरुद्ध तक्रार करायला भाग पाडले. रघुनाथ कुचिक हे माझ्याशी अयोग्य पद्धतीने जरूर वागले आहेत. पण चित्रा वाघ त्यांच्यावर आता नको ते आरोप करत आहेत, असे पीडितेने स्पष्ट केले.

तसेच चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत रघुनाथ कुचिक यांच्याविरुद्ध सादर केलेले सर्व पुरावे खोटे आहेत. चित्रा वाघ यांनी रघुनाथ कुचिक आणि माझे जे चॅटस सादर केले, तसे संभाषण आमच्यात झालेच नव्हते. चित्रा वाघ या काहीतरी यंत्रणा वापरून खोटे चॅटस तयार करत आहेत. कालदेखील माझ्या मोबाईलवरून रघुनाथ कुचिक यांना आणि त्यांच्या मोबाईलवरून मला सतत मेसेज येत होते, असे पीडितेने सांगितले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button