breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

प्रधानमंत्री आवाज योजनेला एक वर्षाची मुदतवाढ द्या’

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची मागणी

पिंपरी |

केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजेनेअंतर्गत 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे हा उपक्रम हाती घेतला होता. परंतु, कोरोना महामारीत दोन वर्षांचा कालावधी गेला. त्यामुळे आवास योजनेच्या गृह प्रकल्पांची कामे अपुरी राहिली. मावळ लोकसभा मतदारसंघातील लाभार्थ्यांना अद्यापही आवास योजनेतील घरांचा ताबा मिळाला नाही. त्यासाठी आवास योजनेतील गृह प्रकल्पांचे बांधकाम पूर्ण करण्याकरिता एक वर्षाची मुदतवाढ द्यावी, अशी महत्वपूर्ण मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली.

याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र दिले आहे. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, भारताच्या राष्ट्रपतींनी 9 जून 2014 रोजी संसदेच्या संयुक्त सत्रात केलेल्या भाषणात देशाच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रत्येक कुटुंबाला नळ कनेक्शन, शौचालयाची सुविधा, 24 तास वीजपुरवठ्यासह पक्के घर असेल असे जाहीर केले होते. तुम्ही देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असताना सन 2022 पर्यंत सर्वांसाठी घरांची संकल्पना मांडली होती. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्र सरकारने सुरुवात केली. त्यासाठी ‘2022 पर्यंत सर्वांसाठी घरे’ ही महत्वपूर्ण योजना हाती घेतली. ही योजना तीन टप्प्यात पूर्ण करण्याचे नियोजन केले होते.

पहिल्या टप्प्यात (एप्रिल 2015 ते मार्च 2017) राज्य, केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या इच्छेनुसार 100 शहरे समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. दुसऱ्या टप्प्यात (एप्रिल 2017 ते मार्च 2019) अतिरिक्त 200 शहरे समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. तिसऱ्या टप्प्यात (एप्रिल 2019 ते मार्च 2022) उर्वरित सर्व शहरे समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मावळ लोकसभा मतदारसंघात या योजनेअंतर्गत अनेक गरजूंना घरे देण्याचे ठरले होते. परंतु, कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे घरांच्या कामावर बंधने आली होती. बांधकाम अनेकवेळा थांबविण्यात आले. त्यामुळे या योजनेचा लाभ झालेल्या लोकांच्या घरांच्या बांधकामाचे काम वेळेत पूर्ण झाले नाही. आता हे काम पूर्ण होण्यास कालावधी उरलेला नाही. आवास योजनेतील अनेक घरांची कामे अपूर्ण आहेत. काम पूर्ण होण्यास वेळ लागणार आहे. या योजनेअंतर्गत वाटप केलेल्या घराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी वाढविण्याची आवश्यकता आहे. काम पूर्ण करण्याकरिता एक वर्षाची मुदतवाढ देण्याची विनंती खासदार बारणे यांनी निवेदनातून केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button