‘स्वच्छ सर्वेक्षणात’ सहभागी होऊ , पिंपरी-चिंचवडला नंबर 1 बनवू
शहर स्वच्छतेसाठी महापालिका प्रशासनाकडून विविध योजना आखण्यात आल्या आहेत. प्लॉगेथॉन, पथनाटय, स्वच्छता मोहिम विविध उपक्रमांद्वारे, चला…“स्वच्छ सर्वेक्षणात” सहभागी होऊ या, पिंपरी चिंचवडला नंबर 1 बनवू या… असा ध्यास शहरातील नागरिक, शाळा, महाविद्यालये, सामाजिक, पर्यावरण संघटनांनी घेतला आहे. तसेच, होय, आम्ही “हर धड़कन है स्वच्छ भारत की, या गीताचे सादरीकरण करून ऑनलाइन फीडबॅक नोंदविला जात आहे.
स्वच्छ सर्वेक्षण पूर्णपणे यशस्वी होण्यासाठी शहरातील नागरीक, शालेय विद्यार्थी, सामजिक संघटना, पर्यावरण संघटना, आरोग्य सेवक, शासकीय – निमशासकीय संस्था, महिला बचत गट, महाविद्यालये, गृहनिर्माण सोसायटया आदींनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला आहे. पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ सर्वेक्षणात देशात प्रथम क्रमांक येण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला आहे. मनपा क्षेत्रिय कार्यालयांच्यावतीने रॅली, पथनाटय, स्वच्छता गीतांद्वारे जनजागृती मोहिम राबवून सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.
महापालिकेच्या अ क्षेत्रिय कार्यालयांतर्गंत येथील प्रभाग क्र. 15 आकुर्डी स्टेशन परिसरात जनजागृतीपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेअंतर्गत उपस्थितांना पर्यावरण संवर्धनाचे व कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व विषद करण्यात आले. स्वच्छतेची पंचसूत्रे व वसुंधरेची पंचतत्वे याबद्दल माहिती देण्यात आली. तसेच वसुंधरेच्या रक्षणाची शपथही देण्यात आली. या कार्यशाळेला सोसायटीतील रहिवाशांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
“क” क्षेत्रीय कार्यालयांतर्गंत इंद्रायणीनगर, भोसरी येथील क्षितीज मंचच्या महिलांनी होम कंपोस्टिंग करत कंपोस्ट मधून टेरेस गार्डन तयार करण्याचा संकल्प केला आहे. महापालिकेच्या वतीने गणेश बोरा, सुनीता शिंदे यांनी कंपोस्टिंग बद्दल माहिती देण्यात आली. महिलांनी महापालिकेने जाहीर केलेल्या घरगुती होम कंपोस्टींग बिन 50 टक्के अनुदानाचा लाभ घेतला. बचत गटातील महिलांनी घरातील व परिसरातील कचरा समस्या दूर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
स्वच्छतेकडून समृद्धीकडे या संकल्पनेतून “ग” क्षेत्रीय कार्यालयांतर्गंत प्रभाग क्रमांक 24 मधील गणेश नगर, म्हातोबा नगर झोपडपट्टी, मंगल नगर, वाकड रोड, रत्नदीप कॉलनी, डांगे चौक या परिसरात रॅली काढण्यात आली. ग क्षेत्रीय अधिकारी रविकिरण घोडके, सहाय्यक आरोग्य अधिकारी राजू बेद, मुख्य आरोग्य निरीक्षक वसंत सरोदे, आरोग्य निरीक्षक सुरेश चन्नाल, शुभम कुपटकर, मुकादम विजय माचरे, प्रशांत पवार, राजू जगताप, अभय दारोळे, अमन वाल्मिकी, सूर्यकांत चाबुकस्वार, सुरेश जगताप, वजीर सौदागर, सुपरवायझर सुजाता सोनवणे यांच्यासह कर्मचारी, घंटागाडी कर्मचारी, दिवाइन संस्था आदींनी रॅलीत सहभाग घेतला. स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभाग नोंदविण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले.
स्वच्छ सर्वेक्षण 2022 अभियानांतर्गत मनपाच्या ह क्षेत्रिय कार्यालयांतर्गंत प्रभाग क्रमांक 20 वायसीएस चौकात जनजागृती मोहिम राबविण्यात आली. या उपक्रमाद्वारे पर्यावरण संवर्धनाचे व कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व सांगण्यात आले. तसेच, स्वच्छतेची पंचसूत्रे व वसुंधरेची पचतत्द्दल माहिती देण्यात आली. सदर कार्यशाळेला सोसायटीतील रहिवाशांचा उत्तम प्रतिसाद देवून वसुंधरेच्या रक्षणाची शपथ घेतली.