breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेच्या कर संकलन विभागामार्फत मार्च महिन्यात ४८३. ५२ कोटी कर वसूली

  • मालमत्ता कर भरून कारवाई टाळण्याचे सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांचे आवाहन

पिंपरी |

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या मालमत्ता धारकांचे थकीत कर वसूलीची कारवाई सुरू आहे. थकबाकीदारांचे कर वसूलीकामी माहे मार्च २०२२ मध्ये करवसूली मोहिम तीव्र करण्यात आलेली असून आतापर्यंत एकूण ४८३.५२ कोटी मालमत्ता कराची वसूली झाली आहे. थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर भरून जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन कर आकारणी व संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त् निलेश देशमुख यांनी केले आहे.

मनपाच्या निगडी प्राधिकरण, आकुर्डी, चिंचवड, थेरगाव, सांगवी, पिंपरी वाघेरे, पिंपरी नगर, मनपा भवन, फुगेवाडी दापोडी, भोसरी, च-होली, मोशी, चिखली, तळवडे, किवळे, दिघी बोपखेल या १६ करसंकलन विभागीय कार्यालयातील वसूली पथकामार्फत थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटीसा देण्याची कार्यवाही चालू आहे. ज्या थकबाकीदारांनी नोटीस देऊनही कर भरण्यास टाळाटाळ केली अशा थकबाकीधारकांची मालमत्ता जप्त करण्यात येत आहे. मालमत्ता जप्ती कारवाई मोहिमेत थकबाकी भरणा न केल्याने मालमत्ता सील केल्या जात आहेत. कर संकलन विभागामार्फत ५७९ मालमत्तांना नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. ४५३ मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे.

तसेच, २८९ थकबाकीधारकांकडून र.रु. १६,८५,५९,८०१/- इतका कर वसूल करण्यात आला असून एकूण १६६ मालमत्तांचे नळ कनेक्शन तोडण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे दि. ७ ते २० मार्च २०२२ या कालावधीत ९९ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये, सभागृह – १, औद्योगिक -४, निवासी- २, बिगरनिवासी- ४९, मोबाईल टॉवर-२, बिगर निवासी मोबाईल टॉवर – २०, बीएसएनएल मोबाईल टॉवर – १, व्यावसायिक – २, मिश्र – ३, इतर – १५ मालमत्ता सील करण्यात आलेल्या आहेत. मालमत्ता कराची थकबाकी वसूलीकामी महापालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली दैनंदिन आढावा घेऊन थकबाकीदारांची मालमत्ता जप्ती मोहीम तीव्र करण्यात येत आहे. अवैध बांधकाम शास्ती वगळून मुळ कराचा भरणा करण्यासाठी नागरिकांना सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी मालमत्ता थकीत मुळ कर भरून पाणीपुरवठा खंडीत होणे, मालमत्ता सील होणे, यासारखी कठोर कारवाई टाळावी, असेही कर आकारणी व संकलन विभागामार्फत कळविण्यात आले आहे. सहाय्यक आयुक्त् कर आकारणी व संकलन विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button