Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय
गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादीचा दारुण पराभव ; ‘नोटा’पेक्षाही कमी मते
![Shiv Sena-NCP defeat in Goa; Less votes than ‘notes’](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/Shiv-sena-NCP-1-goa.jpg)
पणजी । प्रतिनिधी
गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरील आकडेवारीनुसार शिवसेनेला 0.25% मतवाटा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तूर्तास 1.06% मतं मिळाली आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही आकडे ‘नोटा’ला मिळालेल्या मतांपेक्षाही कमी आहेत. नोटाला 1.17% मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला आहे.
दरम्यान, गोव्यातील निवडणूक निकालाचा परिणाम महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होईल, असा अंदाज राजकीय जाणकार वर्तवीत आहेत.