पिंपरी / चिंचवड

घटस्फोट झालेला नसताना पतीने केले दुसरे लग्न

पिंपरी l प्रतिनिधी

पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झालेला नसतानाही पतीने दुसरे लग्न केले. याप्रकरणी पती आई सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 8 मे 2014 ते 2 मार्च 2022 या कालावधीत बावधन, पुणे येथे घडली.

पती सागर हिरामण करंजावणे आणि सासू (दोघेही रा. देशमुखनगर, बावधान) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत 28 वर्षीय विवाहितेने बुधवारी (दि. 2) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी विवाहितेचा कायदेशीर घटस्फोट झालेला नसतानाही पती सागर याने दुसरे लग्न केले. तसेच आरोपी पती व सासू यांनी फिर्यादीचे स्त्रीधन काढून घेतले. तसेच वेळोवेळी शिवीगाळ, टोमणे मारून शाररीक व मानसिक छळ केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group