पिंपरी / चिंचवड

किरकोळ कारणावरून जाधववाडीत दगडाने ठेचून एकाचा खून

पिंपरी l प्रतिनिधी

टेम्पो लावण्याच्या कारणावरून दोघांनी एकाला लाकडी दंडक्याने मारहाण केली. तर एकाच्या डोक्यात दगड घालून त्याचा निर्घृणपणे खून केला. ही घटना गुरुवारी (दि. 24) मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास तळई गार्डन समोरील रस्त्यावर जाधववाडी चिखली येथे घडली.

पंडित किसन गायकवाड (वय 56) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सुरेश पटेल असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. पंडित यांचा मुलगा नवनाथ पंडित गायकवाड (वय 29, रा. जाधववाडी चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरेश उर्फ सुरज नवनाथ राऊत (वय 22, रा. आहेरवाडी चौक, जाधववाडी, चिखली), दीपक प्रदीप पाचपिंडे (वय 22, रा. आहेरवाडी चौक, जाधववाडी, चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री फिर्यादी यांचे वडील पंडित हे त्यांच्या ओळखीचे सुरेश पटेल यांच्यासोबत त्यांच्याकडील टेम्पोत झोपण्यासाठी गेले. तळई गार्डन समोरील रस्त्यावर टेम्पो लावण्याच्या कारणावरून आरोपींनी भांडण केले. शिवीगाळ करून आरोपींनी सुरेश पटेल यांनी लाकडी दंडक्याने मारहाण केली. त्यात पटेल जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी पंडित यांच्या डोक्यात, तोंडावर दगडांनी मारून त्यांचा निर्घृणपणे खून केला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम मस्के तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group