गजानन मारणे यांच्या पत्नी, माजी नगरसेविका जयश्री मारणे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/IMG-20220216-WA0007.jpg)
पुणे / प्रतिनिधी
गजानन मारणे यांच्या पत्नी आणि मनसेच्या माजी नगरसेविका जयश्री मारणे यांनी बुधवारी (दि. 16) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. याबाबतची माहिती पुणे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.
पुणे शहरात महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सत्तेची आगामी गणिते लक्षात घेता इच्छुक उमेदवारांनी पक्षांतर सुरू केले आहे. सर्वाधिक इनकमिंग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सुरू आहे. मनसेच्या माजी नगरसेविका जयश्री गजानन मारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष या नात्याने प्रशांत जगताप यांनी त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे स्वागत केले. यावेळी माजी उपमहापौर दीपक मानकर, नगरसेवक बाबुराव चांदेरे, माजी नगरसेवक बंडू केमसे, नगरसेवक सुभाष जगताप, रुपाली ठोंबरे व अभय मांढरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पक्षाचे अध्यक्ष शरदच पवार, ज्येष्ठ नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या विचारांवर निष्ठा दाखवून जायश्री मारणे राष्ट्रवादी काँग्रेस परिवारात दाखल झाल्या आहेत. येत्या काळात शहरातील अनेक मातब्बर आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये दिसतील.” असे सूचक विधान शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले.