breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारणलेख

पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाचा ‘सारथी’ : आमदार लक्ष्मणभाऊ जगताप

ग्रामपंचायत ते महानगरपालिका अशी विकासाची कुस पिंपरी चिंचवड शहराने बदलली ती या शहरातील जगताप कुटुंबीयांच्या साक्षीने. गाव ते स्मार्ट सिटी अशी परिवर्तनाची नांदी या शहराने दिली ती जगताप कुटुंबियांच्या साक्षीने. आणि याच कुटुंबाचा एक खंदा शिलेदार आज या शहराचे सक्षम नेतृत्व म्हणून सारथ्य करत आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाचा ‘‘सारथी’’ म्हणून आमदार लक्ष्मण जगताप यांचा नावलौकिक आहे.

भाऊ म्हणून ज्यांची ख्याती आहे असे आमदार लक्ष्मण जगताप हे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे सलग तीन टर्म आमदार आहेत.२००९ ला ते अपक्ष म्हणून निवडून आले होते. तर, २०१४ आणि २०१९ ला भाजपकडून ते विजयी झालेले आहेत. त्यापूर्वी २००४ ला ते विधान परिषदेवर निवडून आले होते.२०१७ ला पिंपरी पालिकेत प्रथमच भाजप सत्तेत येण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. कारण त्यावेळी त्यांच्या मतदारसंघातील बहूतांश नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला व पुन्हा निवडून आले.कार्यकर्त्यांचे मोठे जाळे त्यांच्याकडे आहे. सांगवीतील गणेश को ऑपरेटीव्ह बँक,न्यू मिलेनियम इंग्लिश मिडीयम स्कूल,प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्सचे ते संस्थापक, तर पतंजली योगपीठ, हरिव्दारचे ते संस्थापक सदस्य आहेत. सद्गगुरु वामनराव पै जीवन विद्या मिशनचे ते मुख्य सल्लागार आणि आर्ट ऑफ लिव्हींगचे आजीव सदस्य आहेत.

महापालिकेच्या निवडणुकीनंतर २०१७ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी आमदार लक्ष्मण जगताप यांची निवड झाली. ‘राष्ट्रवादी हटाव, पिंपरी-चिंचवड बचाव’ असा नारा देत त्यांनी राष्ट्रवादीच्या पिंपरी-चिंचवडच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला होता. त्यावेळीच त्यांनी आपली नेतृत्वक्षमता अधोरेखित केली. त्यांना मानणारा चाहतावर्ग यामुळे आणखीनच वाढला. त्याचा भाजपला पुढील काळात नक्कीच फायदा झाला. त्यामुळे त्यांच्या शब्दाचे राजकीय वजन आजही तितक्याच ताकदीचे आहे.

पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदावरून ते स्वतःहून पायउतार झाले असले तरी शहराचे ते कारभारी आहेत. गेली ३५ वर्षे ते राजकारणात आहेत. १९८६ ते २००६ अशी सलग वीस वर्षे पिंपरी-चिंचवड पालिकेत ते नगरसेवक होते. १९९३ ला ते स्थायी समिती अध्यक्ष, तर २००२ ला महापौर झाले. २०१४ ची लोकसभा निवडणूक ते शेतकरी कामगार पक्षाकडून लढले. मात्र, त्यात ते पराभूत झाले.शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. तोपर्यंत ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये होते. त्यानंतर २०१४ च्या विधानसभेला ते भाजपकडून निवडून आले.

चार वेळा आमदार राहिल्याने गेल्या फडणवीस मंत्रीमंडळात त्यांना मंत्रीपद मिळेल, अशी शहरवासियांना आशा होती. कारण त्यानिमित्त शहराचाही मंत्रीपदाचा बॅकलॉग त्यानिमित्ताने भरून निघणार होता.मात्र, शेवटच्या क्षणी ही संधी मावळचे आमदार बाळा ऊर्फ संजय भेगडे यांना देण्यात आली. अन् शहराला पुन्हा एकदा मंत्रीपदाने हुलकावणी दिली. मात्र त्यांच्या शब्दाची किंमत राजकीय वर्तुळात शिवाय सामाजिक क्षेत्रात मंत्रिपदावरून ही मोठी आहे. असे त्यांचे चाहते सांगतात यावरूनच त्यांच्या स्वभावाची चुणूक येते.

सायकलिंग, पोहणे आणि घोडेस्वारी यात त्यांना विशेष आवड आहे. अशा या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!!

– निलेश भोंडवे,
आमदार लक्ष्मण जगताप समर्थक.
पिंपरी- चिंचवड.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button