Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
देशात गेल्या 24 तासात 1 लाख 7 हजार कोरोना रुग्णांची नोंद
![6915 new patients, 180 deaths in the last 24 hours in the country](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/corona-4.jpg)
नवी दिल्ली | टीम ऑनलाइन
भारतात कोरोना रुग्णांची संख्येमध्ये भर पडतच आहे. भारतात गेल्या 24 तासांत 1,07,474 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण 2,13,246 रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर 865 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या देशभरात 12,25,011 सक्रिय रुग्ण असून कोविडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ५,०१,९७९ पर्यंत पोहोचली आहे. सध्या देशभरात कोरोना वाढीचा दर 7.42% आहे.
कोरोना संक्रमण रोखण्यासाठी देशभरात लसीकरण वेगाने सुरु असून देशभरामध्ये आतापर्यंत 1,69,46,26,697 लसींचे डोस दिले गेल आहेत.
India reports 1,07,474 fresh #COVID19 cases, 2,13,246 recoveries and 865 deaths in the last 24 hours.
Active cases: 12,25,011
Death toll: 5,01,979
Daily positivity rate:7.42%Total vaccination: 1,69,46,26,697 pic.twitter.com/jbbqjX9NQz
— ANI (@ANI) February 6, 2022