ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी काढलेला एक कोटी दहा लाखांचा गॅससाठा जप्त

सामाजिक सुरक्षा पथकाची मोठी कारवाई
पुणे | पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत रासे येथे मोठी कारवाई केली आहे. गॅसच्या टँकरमधून गॅस चोरी करून तो काळ्याबाजारात विकण्यासाठी ठेवला असता सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई करत तब्बल एक कोटी दहा लाखांचा गॅस साठा जप्त केला आहे. तसेच या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई रविवारी (दि. 12) मध्यरात्री करण्यात आली.नरसिंग दत्तू फड (वय 31, रा. धसवाडी, ता. अंबाजोगाई, जि. बीड), अमोल गोविंद मुंडे (वय 28, रा. वागदरवाडी, ता. अंबाजोगाई, जि. बीड), राजु बबन चव्हाण (वय 52, रा. रासे, ता. खेड, जि. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस हवालदार नितीन लोंढे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, आरोपी नरसिंग आणि अमोल यांना इंडियन ऑइल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई येथून रासे चाकण येथील इंडियन ऑइल प्लांटवर गॅसने भरलेला कॅप्सूलच्या आकाराचा गॅस टॅंकर आणण्याबाबत परिवाहक म्हणून नेमले आहे. त्या दोघांनी मुंबई येथून रासे चाकण येथील इंडियन ऑइल प्लांटवर गॅसने भरलेला कॅप्सूलच्या आकाराचे दोन टँकर चाकण येथे घेऊन जाणे क्रमप्राप्त असताना ते टाळले.

तसेच जाणीवपूर्वक वाहतुकीदरम्यान दोन गॅस टँकर मधून गॅस काढून घेण्यासाठी आरोपी राजू याला संमती दिली. राजू याने त्याच्याकडील गॅस कनेक्टरच्या सहाय्याने गॅस टॅंकर मधील गॅस चोरून घेतला. चोरीचा गॅस काळ्याबाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने, मानवी जीवन धोक्यात येईल अशा प्रकारच्या हयगयीने तो साठवून ठेवला. याबाबत सामाजिक सुरक्षा पथकाला माहिती मिळाली असता पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास कारवाई करत तब्बल 1 कोटी 10 लाख पाच हजार 145 रुपये किमतीचा गॅस जप्त केला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button