रात्रीच्या वेळी दुचाकीस्वाराला आडवून सोनसाखळी पळवली
पिंपरी l प्रतिनिधी
याप्रकरणी 17 वर्षीय मुलाने सोमवारी (दि. 24) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तीन अज्ञात इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र हे दोघे फिर्यादीच्या मोपेड दुचाकीवरून सांगवडे रोडने जात होते. ते राक्षे यांच्या वीटभट्टीजवळ आले असता त्यांच्या पाठीमागून तीन आरोपी दुचाकीवरून आले. त्यातील एकाने फिर्यादी यांच्या डोक्यात टपली मारून थांबवले. त्यानंतर आरोपींनी त्यांची दुचाकी फिर्यादीच्या दुचाकी समोर उभी केली. एका आरोपीने फिर्यादीच्या गळ्यातील एक लाख 40 हजार 900 रुपयांची सोनसाखळी जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर एका आरोपीने त्याच्या कमरेला लावलेला कोयता दाखवून ‘गप्प बस नाहीतर कोयता डोक्यात घालीन’ असा फिर्यादीला दम दिला. पुढील तपास शिरगाव पोलीस करीत आहेत.