पुण्यातील शाळा बंदच राहणार, अजित पवारांच्या बैठकीनंतर मोठा निर्णय
पुणे | प्रतिनिधी
पुण्यातील शाळा बंदच राहणार असल्याची महत्वाची माहिती समोर येत आहे. राज्यातील सर्व शाळा सोमवारपासून सुरू होत असून फक्त पुण्यातील शाळांसाठी स्थानिक प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
यामध्ये शाळांबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर शाळा बंदच राहणार आहेत. पर्यटनस्थळ, उद्याने, जलतरण तलाव यांबद्दल लवकरच नवी नियमावली जाहीर करणार असल्याची माहिती पवारांनी दिशिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात अद्याप शाळा सुरू करण्यास महापौरांनी नकार दिला दर्शवला. त्यानंतर पालकमंत्री अजित पवारांनी बैठक बोलावली. यामध्ये महत्वाची घोषणा झाली आहे.
कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंदच ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या पालकमंत्र्यांच्या कोरोना बैठकीत घेण्यात आला आहे. पुढील बैठकीत रुग्णसंख्येचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. सध्या राज्यातील सर्व शाळा सोमवारपासून सुरू होणार आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात घोषणा केली.
परंतू, शाळांचा निर्णय स्थानिक पातळीवरील प्रशासनाकडे सोपवण्यात आला आहे. त्यानुसार पुण्याच्या महापौरांनी शाळा सुरू करण्यास नकार दर्शवला होता. यानंतर आज पालकमंत्री अजित पवारांच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. मागील चोवीस तासात पुण्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडल्याने सध्या शाळा फक्त ऑनलाईन पद्धतीने सुरू ठेवण्याची घोषणा झाली आहे. रुग्णसंख्या कमी होत नाही, तोपर्यंत ही नियमावली कायम राहणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. तसेच पुढील बैठकीत यासंदर्भात माहिती देणार असल्याचं ते म्हणाले.