पिंपरी / चिंचवड

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

पिंपरी l प्रतिनिधी
लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने तरुणीला पिंपळे गुरव, कात्रज आणि हिंजवडी येथील भाड्याच्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तरुणी गरोदर राहिल्यानंतर तरुणाने तिच्याशी संपर्क करणे बंद केले. ही प्रकार जून 2019 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत घडला.

आकाश शाम राजपुत (वय 28, रा, जुनी सांगवी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने 17 जानेवारी 2022 रोजी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आकाश याने फिर्यादी तरुणीसोबत मैत्री केली. त्यानंतर आकाश याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. प्रथम पिंपळे गुरव, त्यानंतर कात्रज आणि हिंजवडी येथील भाड्याच्या घरात नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. दरम्यान तरुणी गरोदर राहिली. तरुणी गरोदर राहिल्याचे समजल्यानंतर आकाशने तरुणीसोबत संपर्क करणे बंद केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group