Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पिंपळे साैदागरमध्ये निर्मल दिंडीतून नागरिकांचे प्रबोधन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/IMG-20180708-WA0141.jpg)
पिंपरी – नगरसेविका निर्मला कुटे सोशल फाउंडेशन व लोकमान्य हास्य क्लबच्या वतीने पिंपळे साैदागर-रहाटणी येथे संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी दिंडीचे सोहळ्याचे आज (रविवारी) आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नगरसेविका निर्मलाताई कुटे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे, जयनाथ काटे, सुभाष कुंजीर, संजय कुटे, विजय पाटील, राकेश भास्कर, प्रमोद कुंजीर, हास्यक्लबचे संस्थापक सुभाष देसाई, समन्वयक मिणया मिरासे, शाखाप्रमुख दीपक मिरासे, अनंतवार ताई, धोंड्डप्पा कड़ते, रमेश वाणी, भागवत झोपे, विलास नगरकर व हास्य क्लबचे सर्व शाखा प्रमुख उपस्थित होते.
या प्रसंगी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पूजन निर्मलाताई कुटे व संजय कुटे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच विठ्ठलाचे नामस्मरण करुन टाळ मृदंगच्या गजरात दिंडी काढण्यात आली. या दिंडीची सुरवात कोकणे चौकातून करुन त्याची सांगता पिंपळे सौदागरच्या विठ्ठल मंदिरामध्ये करण्यात आली. या दिंडी सोहळ्यात नगरसेविका निर्मलाताई कुटे सोशल फ़ाउंडेशनच्या बाल वारकऱ्यांनी अभंग व नृत्याच्या माध्यमातून प्लास्टिक बंदीवर प्रबोधन करण्यात आले. यावेळी नगरसेविका निर्मला कूटे म्हणाल्या की, या दिंडी सोहळ्या मार्फत नागरिकात निर्मल दिंडी, निर्मल भारत, निर्मल परिसर, झाडे लावा-झाडे जगवा या सामाजिक संदेश देवून पर्यावरण प्रदुषणावर जनजागृती करण्यात आली.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/IMG-20180708-WA0181-300x296.jpg)