धक्कादायक! मानलेल्या भावाला भाडेकरू म्हणून ठेवला, तर त्याने घर मालकिणीवर केला बलात्कार
![Shocking! The incident took place when the victim's daughter became pregnant](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/rape_clipart.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
मानलेल्या भावाला भाडेकरू म्हणून घरात ठेवणं एका महिलेच्या चांगलंच अंगलट आलं आहे. भाडेकरू तरुणाने घर मालकिण असलेल्या महिलेवर बलात्कार केला. ही घटना चिखली येथे 21 डिसेंबर रोजी घडली.
रामहरी वगरे (वय 31, रा. असंगी, ता. जत, जि. सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 31 वर्षीय महिलेने सोमवारी (दि. 10) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रामहरी हा फिर्यादी यांच्या ओळखीचा होता. तसेच फिर्यादी यांनी त्याला भाऊ मानले होते. ओळखीचा असल्याने आरोपी रामहरी याला फिर्यादी यांनी त्यांच्या घराच्या टेरेसवरील खोली भाड्यानेही दिली होती. फिर्यादी कामानिमित्त टेरेसवर गेल्या असता आरोपीने त्यांच्याशी गप्पा मारत त्यांच्यासोबत मोबाईलमध्ये फोटोही काढले.
21 डिसेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास फिर्यादी या पाण्याच्या टाकीचा कॉक सुरु करण्यासाठी टेरेसवर गेल्या असताना फिर्यादी या एकट्याच असल्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने त्यांना टेरेसवरील खोलीत ओढत नेले. रूमची आतून कडी लावून फिर्यादी यांना “तुझे व माझे फोटो तुझ्या नवऱ्याला दाखवेल आणि तुझा नवरा काही बोललाच तर त्याला तेथेच मारून टाकीन. मी सांगेल तसं कर”, असे म्हणून धमकी दिली. फिर्यादी त्यांच्यावर आरोपीने लैंगिक अत्याचार केला. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.