Breaking-newsराष्ट्रिय
भूतानच्या पंतप्रधानांशी राहुल गांधी यांची चर्चा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/raga.jpg)
नवी दिल्ली – भारताच्या दौऱ्यावर आलेले भूतानचे पंतप्रधान शेरींग तोग्बे यांच्याशी राहुल गांधी यांनी आज चर्चा केली. दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ करण्याच्या विषयावर आम्ही व्यापक चर्चा केल्याची माहिती राहुल गांधी यांनी ट्विटरवर दिली.
भूतानचे पंतप्रधान हे तीन दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत. त्यांना कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आहे. आज सकाळी त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेतली.चीनच्या दहशतीखाली असलेल्या या देशाला भारताशी अधिक जवळीक साधणे आवश्यक बनले असून त्यादृष्टीने भारतानेही त्यांना विशेष महत्व दिले आहे.