शशी थरूर यांचा जामीन कायम
नवी दिल्ली – सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात कॉंग्रेस नेते शशी थरूर यांचा जामीन आज दिल्लीच्या कोर्टाने नियमीत केल्याने त्यांना मोठाच दिलासा मिळाला आहे. त्यांना आज या प्रकरणाच्या अनुषंगाने कोर्टात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. त्यानुसार ते हजर राहिले.
शशी थरूर यांना गेल्या 5 तारखेलाच अटकपुर्व जामीन मंजुर करण्यात आला असून त्यांचा हा जामीन आज कोर्टाने कायम केला. एक लाख रूपयांच्या बॉंडवर त्यांना जामीन देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचा हा अटकपुर्व जामीन आता कायम स्वरूपी जामीन झाला आहे.या प्रकरणात त्यांना अटक करण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्याची कुणकुण लागताच थरूर यांनी परवाच अटकपुर्व जामीन मिळवला होता.त्यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर या 17 जानेवारी 2014 रोजी दिल्लीतील एका हॉटेलात संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळून आल्या होत्या.