अल्पवयीन मुलीवर बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर उघडकीस आला प्रकार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/Rape.jpg)
पिंपरी चिंचवड | पुण्यातील लोणीकंद पोलिस स्टेशनच्या हद्दीतील वाघोली येथे एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रकार उघडकीस आला आहे. ही मुलगी गर्भवती राहिल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. लोणीकंद पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माऊली (वय 24) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने तक्रार दिली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी, फिर्यादी या मूळच्या बिहारच्या आहेत. वाघोली परिसरात ते राहतात. दरम्यान 2021 मध्ये फिर्यादी या मूळ गावी गेल्या होत्या. त्यादरम्यान आरोपीने त्यांच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुली लग्नाचे आमिष दाखवले आणि त्यांच्या घरी जाऊन तिच्या सोबत शारीरिक संबंध ठेवले. या प्रकारातून पीडित मुलगी ही गर्भवती राहिली. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. लोणीकंद पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.