शहरात सलग दुस-या दिवशी एकही मृत्यू नाही; 64 नवीन रुग्णांची नोंद
![For the second day in a row, there was no death in the city; Record of 64 new patients](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/corona-mutation-e1613720003185-1.jpg)
67 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज; लसीकरणाचा 25 लाखाचा टप्पा पूर्ण
पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनामुळे सलग दुस-यादिवशी एकही मृत्यू झाला नाही. ही मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे. शहराच्या विविध भागातील 64 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 67 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर, 25 लाखांचा लसीकरणाचा टप्पा पूर्ण झाला आहे.आजपर्यंत शहरातील 4 हजार 506 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 77 हजार 237 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 379 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 174 रुग्ण गृहविलगीकरणात असून 205 सक्रिय रुग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 22 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 250 आहेत. आज दिवसभरात 9 हजार 356 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 25 लाख 6 हजार 641 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.