पुण्यशोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांची जोपासना आवश्यक; माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप यांचे प्रतिपादन
![Punyashok Ahilya Devi Holkar's thoughts must be nurtured; Statement of former corporator Shankarsheth Jagtap](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/e4c5237a-dae5-464a-a511-3a4b8a61275b.jpg)
पिंपरी : प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे कार्य प्रेरणादायी व गौरवास्पद असुन आजच्या पिढीला अहिल्यादेवी यांचा खरा इतिहास समजणे आवश्यक आहे. केवळ पुण्यतिथी जयंती यासारख्या कार्यक्रमांपुरतेच अहिल्याबाईंचे स्मरण न करता त्यांचे व्हिजन , आचार व विचार प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविले पाहिजेत असे मत माजी नगरसेवक व उद्योजक शंकरशेठ जगताप यांनी व्यक्त केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 226 व्या पुण्यतिथीनिमित्त अहिल्यादेवी सेवा संघ, सांगवी यांच्या वतीने पिंपळे गुरव येथील घोडके कॉम्प्लेक्स याठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी महापौर उषा उर्फ माई ढोरे नगरसेवक शशिकांत कदम, सागर आंघोळकर, स्वीकृत नगरसेवक महेश जगताप, नगरसेविका माधवी राजापुरे, उषा मुंडे, युवा उद्योजक माऊलीशेठ जगताप ,माजी स्थायी समिती अध्यक्ष राजेंद्र राजापुरे,महेश भागवत,राहुल जवळकर, डॉ. तुकाराम पाटील प्रा. लक्ष्मण हाके, संघाचे मार्गदर्शक सूर्यकांत गोफणे, अभिमन्यू गाडेकर,पोलीस उपनिरीक्षक संतोष येडे,संघाचे अध्यक्ष अजय दूधभातेआदींसह सर्व पदाधिकारी, सभासद व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी व्याख्याते सुनील धनगर यांनी आपल्या व्याख्यानातुन अहिल्यादेवींच्या कार्यांचा आढावा घेतला. महापौर माई ढोरे यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बाबासाहेब चितळकर, सुधाकर सुर्यवंशी, ज्ञानेश्वर वाघमारे ,संगिता वाघमारे,मेजर संभाजी गोफणे, डॉक्टर दिनेश गाडेकर, मारुती काळे आदींचा सन्मान करण्यात आला .
शंकरशेठ जगताप यांचा विशेष सन्मान
यावेळी नरवीर तानाजी तानाजी मालुसरे समाधी स्थळ व सिंहगड परिसर स्वच्छता व देखभालीसाठी विशेष योगदान दिल्याबद्दल उद्योजक शंकरशेठ जगताप यांचा संघाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना शंकरशेठ जगताप म्हणाले की, खरे तर सत्काराऐवजी सिंहगडाच्या ठिकाणी जाऊन श्रमदान करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा .सिंहगडाच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी दोन बिया लावल्या ,प्लास्टिक कचरा उचलला तर हेच खऱ्या अर्थाने आपले उल्लेखनीय कार्य ठरणार आहे. दरम्यान गेली तीस वर्षात सांगवी पिंपळे गुरव परिसरात अहिल्यादेवी सेवा संघाचे कार्य खरोखरच उल्लेखनीय व कौतुकास्पद असल्याचा उल्लेखही यावेळी जगताप यांनी केला.
सूर्यकांत गोफणे यांनी प्रास्ताविक केले. गजानन पातुरकर यांनी सूत्रसंचालन केले तर मनोजकुमार मारकड यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघाच्या सर्व सभासदांचे सहकार्य लाभले.