Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय
१५२ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांची राजघाटावर गांधीजींना आदरांजली
नवी दिल्ली – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सकाळी राजघाटावर जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. लालबहादूर शास्त्री यांचीही आज जयंती आहे. त्यानिमित्त त्यांनाही आदरांजली वाहण्यात आली.
२ ऑक्टोबर हा महात्मा गांधीजींचा जन्मदिवस ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन’ म्हणून पाळला जातो. गांधी जयंती निमित्त आज राजघाटावर सर्वधर्मीय प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना राजघाटावर जाऊन श्रद्धांजली वाहिली.





