लिव्ह ईन रिलेशनशिप’मधून जन्मलेले बाळ तरुणाने केले गायब, अडीच वर्षांनंतर गुन्हा दाखल
![A young man born out of a live-in relationship has gone missing, filing a case two and a half years later](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/crime-police-FIR.jpg)
पिंपरी चिंचवड | लिव्ह इन रिलेशनशिपमधून जन्मलेल्या बाळाला घरचे नाकारतील या भीतीपोटी अनाथ आश्रमात ठेवतो असे म्हणून तरुण या बाळाला घेऊन गेला. मात्र याबाबत अनेकदा विचारणा करूनही योग्य ती माहिती मिळत नसल्यामुळे तब्बल अडीच वर्षानंतर तरुणीने पोलिसात धाव घेतली. यानंतर मुंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे.शुभम महेश भांडे (वय 23) आणि त्याचा मित्र योगेश सुरेश काळे (वय 26) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी एका 25 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी शुभम आणि फिर्यादी तरुणी एकाच कंपनीत काम करत होते. यादरम्यान दोघात पूर्ण झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर 2017 पासून दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. यातून फिर्यादीला गर्भधारणा झाली. फिर्यादीने आरोपी शुभम याला याची माहिती दिल्यानंतर मी तुझ्या सोबत लग्न करणार आहे असे सांगून फिर्यादी सोबत स्वतःचे पती म्हणून नाव लावले आणि तिला ससून रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर फिर्यादीने 14 मार्च 2019 रोजी एका बाळाला जन्म दिला.
दरम्यान या बाळाला केशवनगर मुंढवा येथील घरी आणल्यानंतर फिर्यादी तरुणीने शुभमला याबाबत घरी सांगण्यासाठी सांगितले. परंतु इतक्यात घरचे आपल्याला स्वीकारणार नाहीत असे सांगून शुभमने बाळाला तात्पुरते आश्रमात ठेवतो असे सांगितले. याला फिर्यादीचा विरोध असतानाही हा विरोध झुगारून त्याने मित्र योगेश काळे एच एस सी संगणमत करून 27 मार्च 2019 रोजी बाळाला घेऊन गेला. त्यानंतर घरी येऊन बाळाला आश्रमात दिले असल्याचे सांगितले.
या घटनेनंतर फिर्यादीने अनेकदा शुभमकडे बाळाविषयी विचारणा केली असता त्याने आतापर्यंत उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर फिर्यादीने मुंढवा पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.