24 तासांत केरळमध्ये 31,265 तर, महाराष्ट्रात 4,831 नवे कोरोना रुग्ण
![In 24 hours, Kerala has 31,265 new corona patients, while Maharashtra has 4,831 new corona patients](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/383720-corona-logo-7.jpg)
पुणे | भारतात कोरोना संसर्गाचा वेग मंदावत असल्याचे चित्र असले तरी केरळ आणि महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासांत केरळमध्ये 31 हजार 265 तर, महाराष्ट्रात 4 हजार 831 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. देशभरात मागील 24 तासांत 45 हजार 083 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे.आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 26 लाख 95 हजार 030 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 18 लाख 88 हजार 642 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 35 हजार 840 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सध्याच्या घडीला देशात 3 लाख 68 हजार 558 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी केरळमध्ये 2 लक्ष 05 हजार 440 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, महाराष्ट्रात 51 हजार 821 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.गेल्या 24 तासांत देशभरात 460 रुग्णांचा मृत्यू झाला आहे असून, भारतात आजवर 4 लाख 37 हजार 830 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.33 टक्के एवढा आहे. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 97.53 टक्के एवढा झाला आहे.आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 51 कोटी 86 लाख 42 हजार 929 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 17 लाख 55 हजार 327 नमूने तपासण्यात आले आहेत.
लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशात आत्तापर्यंत देशात 63 कोटी 09 लाख 17 हजार 927 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.