पिंपरी / चिंचवड
इंटेरियर डिझाईनिंगच्या ऑफिस मध्ये अडीच लाखाची चोरी
पिंपरी चिंचवड | इंटेरियर डिझाईनिंगच्या ऑफिस मध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. ऑफिसमधून चोरट्यांनी दोन लाख 65 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना झेप इंटेरियर डिझाईनिंग ऑफिस पाटील प्लाझा चिंचवड स्टेशन येथे शनिवारी (दि. 7) ते सोमवार (दि. 9) दरम्यान घडली.
सागर पुरुषोत्तम गुंजाळ (वय 35, रा. नेवाळे वस्ती, चिखली) यांनी या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी गुंजाळ यांच्या ऑफिसच्या सेफ्टी डोअरचा कडी-कोयंडा कशाच्या तरी सहाय्याने कट केला. त्यानंतर ऑफिसमध्ये प्रवेश करून रोख रक्कम व मोबाईल असा एकूण दोन लाख 65 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.