701 देशी वृक्षांच्या सानिध्यात मैत्रीदिन साजरा, आर्ट ऑफ लिव्हिंगचा उपक्रम
![Celebrating Friendship Day in the company of 701 native trees, an Art of Living initiative](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/Art-of-Living-initiative.jpg)
पिंपरी चिंचवड | ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार मैत्रीदिन म्हणून साजरा केला जातो. रविवारी (दि.01) आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे अनोख्या पद्धतीने मैत्री दिन साजरा करून वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
श्रीक्षेत्र देहू येथील भंडारा डोंगरावर आर्ट ऑफ लिव्हिंग माध्यमातून 701 देशी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या वृक्षांच्या सानिध्यात राहून आर्ट ऑफ लिव्हिंग ने यावेळचा मैत्रीदिन साजरा केला.
‘वृक्ष हे आपले खरे मित्र असतात’ म्हणून वृक्षांसोबत राहून त्यांचे संगोपन करत मैत्रीदिन साजरा करण्यात आला.भंडारा डोंगरावर आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे मागील दोन महिन्यापासून 701 देशी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. संस्थेमार्फत पुढील पाच वर्षात सुमारे एक लाख वृक्षांची लागवड करून त्यांचं संगोपन करण्याचा निर्धार केला आहे.
रविवारी मैत्रीदिनादिवशी स्वयंसेवकांनी याठिकाणी येऊन वृक्षांना खत – पाणी घातले, त्यांच्या भोवती जाळी लावली तसेच, इतर आवश्यक कामं केली. वन भोजन केल्यानंतर अनुभव कथनाने मैत्रीदिनाची सांगता झाली.