माझी अवस्था खडसेंसारखी होऊ देणार नाही, अविरत संघर्ष करत राहीन – पंकजा मुंडे
मुंबई: केंद्रीय मंत्री मंडळाच्या विस्तारांनंतर राज्यात भाजप मध्ये मोठं नाराजी आणि राजीनामा नाट्य पाहायला मिळालं. खासदार प्रीतम मुंडेंची केंद्राच्या मंत्री मंडळात वर्णी न लागल्याने, नाराज मुंडे समर्थकांनी राजीनामास्त्र बाहेर काढले आणि तब्ब्ल १०० च्या वर भाजप पदाधिरकऱ्यांनी आपला राजीनामा दिला.
यानंतर, आता पुन्हा एकदा पंकजा मुंडे एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाल्या की, ज्यांच्यावर अन्याय झाला ते सर्व नेते ओबीसी समाजातील आहेत. मी पक्ष सोडण्याचा विषय कुणी आणला याचा शोध घ्या. मी असे कधीच म्हणाले नाही. माझ्या बुद्धीला ते पटत नाही. ऑफर तर सगळ्या पक्षांकडून होत्या. मंत्रिपदाची ऑफर होती तेव्हा. पण मुंडे साहेबांनी जो पक्ष वाढवला, मला ज्या पक्षाने वाढवलं तो मी सोडून का जाऊ? माझी अवस्था खडसेंसारखी होऊ देणार नाही. अविरत संघर्ष करत राहीन.
याबाबत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “फडणवीस यांनी आणि मी एकत्र काम केलं आहे. ते राजकीय पटलावर माझे सहकारी आहेत. मुख्यमंत्री म्हणून माझे बॉस आहेत. मात्र, मी राष्ट्रीय सचिव असल्याने, राजकारणात माझे नेते राष्ट्रीय स्तरावरील आहेत.मी त्यांच्या टीममध्ये काम करते. म्हणून मोत्यांची नवे घेतली आणि त्यांची जाऊन भेट घेतली आणि त्यांचा जो काही निर्णय असेल, तो मला मान्य आहे,” असं म्हणत आपल्या त्या वक्तव्याचे पुन्हा एकदा समर्थान केले आहे.