पंकजा मुंडे यांनीही अन्याय केला होताच ना! त्या वेळी त्या माणसांना काय वाटत असेल? विनायक मेटे
![Even Pankaja Munde did injustice! Vinayak Mete](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/नाना-पाटोळे-हे-महत्त्वाची-व्यक्ती-त्यांनी-गांभीर्याने-घेऊ-नये-संजय-राऊत-यांचा-मोलाचा-सल्ला.-2.jpg)
नांदेड: खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी राजीनामे दिले. पण त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे राजीनामे द्यावे, ते स्वीकारले तरी जातील अशी प्रतिक्रिया देत आमदार विनायक मेटे यांनी राजीनामा सत्र नाट्य असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले. इतकंच नाहीतर पंकजा मुंडे काही चुकीचा निर्णय घेणार नाही असंही विनायक मेटे यांनी म्हटलं आहे
आमदार विनायक मेटे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडेंना पक्षावर नाराज न होण्याचा सल्ला दिला. तसेच त्यांच्या काळातही काहींवर अन्याय झालाच होता, याचीही आठवण त्यांना करून दिली.
विनायक मेटे असेही म्हणाले की, ‘भाजपाने मुंडे कुटुंबाला खूप काही दिले. याची जाणीव पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनापण आहे. त्यामुळे पंकजा मुंडे काही चुकीचा निर्णय घेतील असं वाटतं नसल्याचे’ आमदार मेटे म्हणाले आहे. विनायक मुंडे म्हणाले की, ‘भाजपाने मुंडे कुटुंबाला खूप काही दिले. याची जाणीव पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनापण आहे. त्यामुळे पंकजा मुंडे काही चुकीचा निर्णय घेतील असं वाटतं नसल्याचे’ आमदार मेटे म्हणाले आहे.