breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

सेल्फ मेडिकेशनमुळे होणाऱ्या आरोग्य तक्रारींमध्ये झाली वाढ

ठाणे – कोरोनाचा उद्रेक होण्याआधी व कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतरही नागरिकांमध्ये सेल्फ मेडिकेशनचे सवय गेलेली दिसत नाही व याचे गंभीर परिणाम नागरिकांमध्ये दिसून येत आहेत. कोणत्याही छोट्या-मोठ्या कारणांसाठी स्वतःच डॉक्टर बनून वाटेल त्या गोळ्या घेणारे अनेक नागरिक साईडइफेक्टच्या त्रासांमध्ये अडकून पडत असल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. तसेच सेल्फ मेडिकेशनमुळे मानसिक आजारालाही सामोरं जावे लागत आहे.

शरीराला होत असलेल्या वेदनांवर आपल्या घराजवळच्या मेडिकल दुकानाची मात्रा वापरात असल्याचे समोर आले आहे. याविषयी अधिक माहिती देताना कल्याण येथील स्टारसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व जेष्ठ फिजिशियनव व छातिरोग तज्ञ डॉ. प्रवीण भुजबळ सांगतात , ” डोकेदुखी, ताप, सर्दी , ऍसिडिटी वाढणे, हातापायात वेदना होणे यासारख्या रोजच्या तक्रारींवर बहुसंख्य नागरिक मेडिकल दुकानांमधून औषधे विकत घेतात परंतु अनेकवेळा हृदयविकार, मेंदूचे विकार व सांध्याच्या विकारांवर योग्य उपचार होणे गरजेचे असतात. चुकीच्या पद्धतीने घेतलेलं म्हणजेच सेल्फ मेडिकेशनद्वारे घेतलेली औषधे शरीरावर विपरीत परिणाम करू शकतात, म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतंही औषध घेऊ नये. पेनकिलरच्या अतीसेवनामुळे किडनी व हृदयाला सर्वाधिक धोका निर्माण होऊ शकतो.

कोरोना संक्रमणात लॉकडाउनमुळे सेल्फ मेडिकेशनचा वापर वाढू लागल्याचे आमच्या निदेर्शनास आले आहे. यासोबतच अनेक वेळा डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे डॉक्टरांना न विचारता वारंवार घेतली जातात तेही आरोग्याला हानीकारक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेतल्यामुळे कोरोना संक्रमणात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे , अजूनही कोरोनाची संक्रमण थांबलेले नाही त्यामुळे नागरिकांनी शरीरातील प्रतिकार शक्ती वाढविण्याची औषधे सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी. २०१६ साली प्रसिद्ध झालेल्या एका वैद्यकीय रिपोर्टनुसार भारतामध्ये ५३% लोक सेल्फ मेडिकेशन करत होते व त्यावेळी आपल्याकडे फक्त २० टक्के नागरिक इंटरनेट वापरत होते व आज तेच प्रमाण ४५ टक्के झाले आहे आजार जरी समान असले तरी प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार त्याची ट्रीटमेंट ठरते.अनेक क्रोनिक आजारांचं कारण हे “सेल्फ मेडिकेशन किंवा चुकीचे औषधोपचार” हे आहे. सेल्फ मेडिकेशनमुळे मृत्यू पावणाऱ्यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

पेनकिलर व हृदयविकार याबाबत माहिती देताना नेरुळ येथील शुश्रूषा हार्ट केयर सेन्टर व मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व हृदय शल्यविशारद डॉ. संजय तारळेकर म्हणाले, ” अनेकवेळा हृदयविकाराची सौम्य लक्षणे अनेक नागरिकांमध्ये दिसून येतात परंतु ही लक्षणे दिसल्यावर अनेकजण पेनकिलर म्हणजे वेदनाशामक गोळ्यांच्या मारा करतात त्यामुळे पुढील काही दिवस ती लक्षणे दिसत नाहीत व रुग्णाला खात्री वाटते की आपला आजार बरा झाला आहे परंतु तोच आजार थोड्याच दिवसांनी परत उफाळून येतो व त्यावेळी त्याचे निदान करणे कठीण जाते. नियमित ऍसिडिटी होणे, बोलताना व चालताना धाप लागणे, सतत घाम येणे व छातीत दुखणे अशी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शारीरिक तपासणी करणे गरजेचे असते. वैद्यकीय चिकित्सा शिकण्यासाठी डॉक्टर आयुष्यातील १० ते १५ वर्षे खर्ची घालतात. पण, अनेकजण इंटरनेटवरून ३०-४० मिनिटांत स्वतःच स्वतःची औषधे निवडतात. त्या औषधांच्या साइडइफेक्टममुळे अनेकदा जिवावर बेतण्याची शक्यता असते.”
पूर्वीच्या काळी घरात अनुभवी आजी आजोबा असायचे. त्यामुळे, घरात कोणाला काही झालं की आजीच्या बटव्यातली औषधे हा बरेचदा रामबाण उपाय ठरायचा. परंतु आता परिस्थिती वेगळी आहे. आता अनुभव कमी आणि बटवा मात्र मेडिकलमध्ये सहज उपलब्ध असलेल्या औषधांनी भरलेला आहे हेच सत्य आहे. पैसे वाचविण्यासाठी सेल्फ मेडिकेशनचा पर्याय मात्र निवडू नका कारण आज वाचवलेले शेकडो रुपये उद्याच्या लाखो रुपयांच्या खर्चाचे कारण ठरू शकतील असा सल्ला जेष्ठ फिजिशियनव व छातिरोग तज्ञ डॉ. प्रवीण भुजबळ यांनी दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button